गोंदिया जिल्ह्यात आज आदिवासी समाजाने आपल्या हक्कांसाठी एल्गार मोर्चा काढला. इंदिरा गांधी स्टेडियमपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने आदिवासी महिला आणि पुरुष सहभागी झाले. धनगर आणि बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गात आरक्षण देण्यास विरोध करत तसेच इतर समाजांना आदिवासींमध्ये समाविष्ट करू नये या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा शांततेत पार पडला असून, सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.