राज्यातील बंजारा समाजाने हैदराबाद गॅझेट नुसार एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी लावून धरली आहे राज्यभरातील बंजारा समाज वेगवेगळ्या ठिकाणी आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाज मोर्चे, आंदोलने, उपोषणे करीत आहेत. आज अहिल्यानगर शहरात बंजारा समाजाच्या वतीने विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाभरातून सुमारे १० हजार बंजारा बांधव या मोर्चाला उपस्थित आहेत. या मोर्चादरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे पोस्टर झळकविण्यात आले आहे. मोर्चाला नगर शहरातील क्लेरा ब्रूस प्रांगणातून सुरुवात झाली असून नगर – छ. संभाजीनगर महामार्गावरुन मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे. दरम्यान या मोर्चात महिलांचा लक्षणीय सहभाग पहायला मिळाला. यावेळी राज्य सरकारने बंजारा समाजाला st प्रवर्गातून आरक्षण न दिल्यास थेट दिल्लीला धडकणार असल्याचे यावेळी समाज बांधवांकडून सांगण्यात आले. आरक्षणसंबंधी आमचे नवराष्ट्रचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी समाज बांधवांकडून भावना जाणून घेतल्या आहेत..