धुळे शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. देवपूर परिसरातील इंदिरा गार्डनजवळ एकाच दिवशी 12 श्वानांचा मृत्यू झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, प्राणीप्रेमींनी याबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.प्राणीप्रेमी मीनाक्षी पाटील यांनी सांगितले की, शहरात भटक्या श्वानांची संख्या वाढली असून नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. अशातच या 12 श्वानांचा मृत्यू झाल्याने नागरिक आणि प्रशासन दोन्ही चिंतेत आले आहेत.मनपा अधिकारी चंद्रकांत पाटील यांनी प्राथमिक प्रतिक्रिया देताना सांगितले की, नैसर्गिक कारणांनी या श्वानांचा मृत्यू झाला असावा. मात्र, चौकशीसाठी कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास त्याची सखोल तपासणी केली जाईल. दुसरीकडे प्राणीप्रेमींनी ही घटना संशयास्पद असल्याचे सांगत मनपा प्रशासनाने तत्काळ या घटनेची दखल घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.