दिल्लीमध्ये सध्याचे राष्ट्रपती भवन आणि रायसोनी गावाची जागा ही होळकरांची आहे. याच परिसरात अहिल्यादेवी होळकर यांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे. अशी मागणी आपण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे. तसेच प्रथमच धनगर वाड्यातून बाहेर येत, अहिल्यादेवींची देशभर जयंती साजरी होत आहे. याचे सारे श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्यावे लागेल. असे तोंड भरून कौतुक भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीच्या निमित्ताने चौंडी येथे दीपोत्सव आयोजित केला आहे. तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून, राष्ट्रपती मुख्यमंत्री ही या कार्यक्रमाला येणार असल्याची माहिती पडळकर यांनी दिली. यावेळेस संघाने देशभर जयंती साजरी करत असताना, देशातील अनेक मुख्यमंत्र्यांना देखील अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात सहभागी करून घेतले असल्याचेही पडळकर यांनी सांगितले.