
crime(फोटो सौजन्य- social media)
नेमकं काय घडलं?
एका २५ वर्षीय विवाहितेने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव अरुणा ठोंबरे असे आहे. अरुणाला तीन गोंडस मुली झाल्या. मात्र सासरच्यांना मुलगा हवा होता. म्हणून बुरसूटलेल्या मानसिकतेने अरुणाच्या सासरच्यांनी तिचा छळ करायला सुरुवात केली. अरुणाचा पती उद्धव ठोंबरे हा दारू पिऊन अरुणाला मारहाण करत होता. शारीरिक आणि मासिक त्रास देत होते. याच त्रासाला कंटाळून अरुणने टोकाचा पाऊल उचलला. ही घटना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील उंदरी गावात १० जानेवारीला घडली. तिने पंख्याला साडीने गळफास घेत आत्महत्या केली.
पोलीस तपास सुरु?
या प्रकरणी अरुणाचा भाऊ गोविंद सूर्यवंशी याने वडगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. याच्या तक्रारींवरीन पोलिसांनी उद्धव ठोंबरे, इंदुबाई ठोंबरे आणि सासरा उत्तम ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस तपास करत आहे.
सिगारेट देण्यास नकार दिल्याने तरुणाने दुचाकीच पेटवली; दुकानाचेही झाले नुकसान
खळबळजनक ! बीडमध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; कोर्टाने नराधमाला सुनावली ‘ही’ शिक्षा
आता बीडमध्ये एका सहा वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. सुंदर निवृत्ती तायड (वय ३४, रा. रामपुरी ता. गेवराई, जि. बीड) असे अत्याचार करणाऱ्या नराधमाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी याच्याविरुद्ध गुन्ह्याचे दोषारोप पत्र सत्र न्यायालय बीड येथे दाखल करण्यात आलेले होते. पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपत्रातील सर्व साक्षीदार तसेच तपास कामी गोळा केलेले सर्व पुरावे यावरून गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुंदर निवृत्ती तायड याला बीड येथील सत्र न्यायालयाने २० वर्ष कारवास आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. तलवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील रामपुरी येथे ४ मे २०२२ रोजी सहा वर्षीय चिमुकलीवर बलात्कार प्रकरणी तलवाडा पोलिस स्टेशन येथे लैंगिक अत्याचारापासून बालकाचे संरक्षणासह विविध कलमांन्वये आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ans: आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव अरुणा ठोंबरे आहे.
Ans: मुलगा होत नसल्याने पती व सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळामुळे तिने आत्महत्या केली.
Ans: पती उद्धव ठोंबरे, सासू इंदुबाई ठोंबरे आणि सासरे उत्तम ठोंबरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.