Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: कॉलेज राजकारणामुळे भावाचा आत्महत्येचा प्रयत्न; जीव वाचवताना प्राध्यपिका 80% जळाल्या; मृत्यूशी झुंज

मानलेल्या भावाचा आत्महत्येचा प्रयत्न रोखताना प्रा. ममता राठी यांना अपघाताने आग लागली. डिझेलच्या बाटलीवरून झालेल्या झटापटीत त्या 80 टक्के भाजल्या. पोलिस जबाबानंतर घातपाताचा संशय दूर झाला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 08, 2026 | 02:21 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • मानलेल्या भावाने आत्महत्येचा इशारा दिल्यानंतर प्रा. ममता राठी घटनास्थळी पोहोचल्या
  • डिझेलची बाटली हिसकावण्याच्या प्रयत्नात आग लागली
  • प्रा. ममता राठी 80 टक्के भाजल्या, प्रकृती अतिचिंताजनक
बीड: बीड येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मानलेले भाऊ याला आत्महत्येपासून वाचवतांना प्राध्यापिका ८० टक्के जाळल्याची घटनासमोर आली आहे. डॉ. ममता शामसुंदर जखोटिया (राठी) असे प्राध्यापिकाचे नाव आहे. तर मानलेल्या भावाचे नाव धनाजी आर्य असे आहे. ममता राठी या एका नामांकित संस्थेत प्राध्यापिका होत्या. त्यांच्यावर लातूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. आधी या दुर्घटनेचा सगळ्यांना घातपाताचा संशय होता. मात्र ममता राठी यांच्या जबाबातून स्पष्ट झाले आहे.

हॉटेल ‘टू बीएचके’ला दणका; मद्यविक्रीचा परवानाच केला रद्द

काय नेमकं घडलं?

डॉ. ममता राठी (रा. पिताजी माउली नगरी, अंबाजोगाई) या अंबाजोगाई येथील एका नामांकित महाविद्यालयात वाणिज्य विषयाच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. ४ जानेवारीला त्यांचे सहकारी आणि मानलेले भाऊ धनाजी आर्य यांनी त्यांना फोन केले. त्यांनी कॉलेजमधील राजकारणामुळे आपल्याला मोठा त्रास होत असल्याने आता जगण्याची इच्छा उरली नसल्याचे सांगितले. भावाचा जीव धोक्यात असल्याचे लक्षात येताच ममता यांनी तात्काळ जवळगाव फाटत गाठला. त्यांनी त्याठिकाणी धनाजी आर्य हे हातात डिझेलची बाटली घेऊन स्वतःला संपवण्याच्या तयारीत असल्याचे पहिले.

धनाजी आर्य स्वतःच्या अंगावर डिझेल ओतत असतांना ममता यांनी धाडसाने त्यांच्या हातातील बाटली हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत बाटलीतील डिझेल ममता यांच्या अंगावर सांडले. ममता यांनी धनाजीच्या हातात असलेली काडीपेटी देखील फेकून दिली. मात्र त्याच वेळी त्यांच्या कोटला अचानक आग लागली. नंतर ही आग त्यांच्या अंगालाही लागली. यामुळे त्या गंभीररित्या भाजल्या.

यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी आणि धनाजी आर्य यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि तातडीने उपचारासाठी लातूर येथील रुग्णालयात हलवले. सध्या ममता राठी यांच्यावर लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्या 80 टक्के भाजल्याने त्यांची प्रकृती अतिचिंताजनक आहे. असे पोलिसांनी सांगितले.

ममता राठी यांचे हजारो फॉलोअर्स

प्राध्यापक ममता राठी या उच्च विद्याविभूषित असून त्यांनी वाणिज्य विषयात पीएचडी प्राप्त केली आहे. त्या सहजसोप्या भाषेत आपल्या विषय समजावतात. त्यांचे स्वतःचे युट्युब चॅनल आहे. त्याद्वारे त्या विध्यार्थ्यांसाठी नियमित शैक्षणिक मार्गदर्शनपर व्हिडीओ पोस्ट करतात. या चॅनलला हजारो फॉलोअर्स आहेत.महाविद्यालयातील इतरही अनेक उपक्रमात त्यांचा सहभाग असतो. या घटनेने शहरातील शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Dharashiv Crime: पत्नीनेच प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; आधी दारू पाजली, नंतर मिरची पावडर टाकून…

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: बीड जिल्ह्यातील जवळगाव फाटा परिसरात.

  • Que: प्रा. ममता राठी कशामुळे भाजल्या?

    Ans: आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या भावाला रोखताना डिझेल सांडून अपघाताने आग लागली.

  • Que: हा घातपाताचा प्रकार होता का?

    Ans: नाही. पोलिस जबाबानुसार हा अपघाती जळीत प्रकार आहे.

Web Title: Beed crime due to college politics a brother attempted suicide a professor suffered 80 burns while trying to save his life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 02:05 PM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Beed Crime: ओळखी वाढवली, फिरायला नेण्याचे आमिष दाखवले, कारमध्ये बसवले आणि..; अल्पवयीन मुलीवर डोंगरात निर्जनस्थळी लैंगिक अत्याचार
1

Beed Crime: ओळखी वाढवली, फिरायला नेण्याचे आमिष दाखवले, कारमध्ये बसवले आणि..; अल्पवयीन मुलीवर डोंगरात निर्जनस्थळी लैंगिक अत्याचार

Dharashiv Crime: पत्नीनेच प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; आधी दारू पाजली, नंतर मिरची पावडर टाकून…
2

Dharashiv Crime: पत्नीनेच प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; आधी दारू पाजली, नंतर मिरची पावडर टाकून…

Palghar Crime: पालघरमध्ये लग्नाचं आमिष देत 20 वर्षीय आदिवासी तरुणीची 3 लाखांत विक्री; गर्भावस्थेत मारहाण, जेवण नाही आणि…
3

Palghar Crime: पालघरमध्ये लग्नाचं आमिष देत 20 वर्षीय आदिवासी तरुणीची 3 लाखांत विक्री; गर्भावस्थेत मारहाण, जेवण नाही आणि…

Dharashiv Crime: तुळजापुर हादरलं! चुलत्यानेच 13 वर्षीय पुतण्याचा काढला काटा; आई-काकाच्या अनैतिक संबंधांची माहिती…
4

Dharashiv Crime: तुळजापुर हादरलं! चुलत्यानेच 13 वर्षीय पुतण्याचा काढला काटा; आई-काकाच्या अनैतिक संबंधांची माहिती…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.