जालना जिल्ह्यातील अंबड नगरपरिषद निवडणूक प्रचारासाठी झालेल्या सभेत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मतदारांना उज्ज्वल भविष्यासाठी कमळाचे बटन दाबण्याचे आवाहन केले. केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे नगरपरिषदही भाजपच्या ताब्यात आल्यास अंबड शहर व परिसराचा सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार देवयानी कुलकर्णी यांसह सर्व भाजप नगरसेवक उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याची विनंतीही त्यांनी यावेळी केली.