मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बीड-जालन्यात मध्यरात्री टायर जाळले
मागील पाच दिवसांच्या उपोषणाने मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृती खालावल्याचे कळताच मराठा समाज बांधव चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. जालना-जळगाव महामार्गावरील केदारखेडा येथे मध्यरात्री आंदोलकांनी टायर जाळून सरकारचा निषेध केला. राज्य सरकार जाणीवपूर्वक जरांगे पाटील यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. सरकारने तातडीने आंदोलनाची दखल घेऊन मराठा आरक्षणाच्या मागणीवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली.
IND vs AFG: 8 खेळाडूंमध्ये फेरबदल, आता श्रेयस अय्यरच्या टीमला रोखणे अशक्य; दमदार खेळाडूंचा समावेश
बीडमध्येही आंदोलन; परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष
जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस उजाडला असताना बीडमध्येही मराठा बांधवांनी आंदोलन करत सरकारविरोधात संताप व्यक्त केला. काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्याने प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.
दरम्यान, जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असतानाही सरकारकडून ठोस भूमिका जाहीर होत नसल्याने मराठा समाजात अस्वस्थता वाढत चालली आहे. आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता लक्षात घेता बीड आणि जालना जिल्ह्यांतील परिस्थितीवर प्रशासनाकडून लक्ष ठेवले जात आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत तसेच सरकारकडून आंदोलनाची दखल घेणार की नाही, याकडे आता मराठा समाजासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
निकाहाला नकार, सनकी आशिकने १७ वर्षीय मुलीचा ओढणीने आवळला आवळून घेतला जीव; १२ तासांत अटक
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. मात्र, उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावल्याने मराठा समाजात संतापाची लाट उसळली आहे. सरकार आंदोलनाची दखल घेत नसल्याचा आरोप करत मराठा बांधवांनी बीड आणि जालना जिल्ह्यांत रस्त्यावर उतरून आंदोलन केले. काही ठिकाणी टायर जाळून निषेध करण्यात आल्याने दोन्ही जिल्ह्यांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बीडमध्येही आंदोलन; परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष
जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस उजाडला असताना बीडमध्येही मराठा बांधवांनी आंदोलन करत सरकारविरोधात संतापाची भावना व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्याने प्रशासन आणि पोलिस यंत्रणाही अलर्ट मोडवर आली आहे. तर जरांगे पाटलांची प्रकृती खालावत चालली असतानाही. सरकारकडून ठोस भूमिका जाहीर होत नाही. हे पाहून मराठा समाजातील अस्वस्थता वाढत चालली आहे. आंदोलन वाढण्याची शक्यता लक्षात घेता बीड आणि जालना जिल्ह्यांतील परिस्थितीवर प्रशासनाकडून लक्ष ठेवले जात आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत तसेच सरकारकडून आंदोलनाची दखल घेतली जाते की नाही, याकडे आता मराठा समाजासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.






