सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपच्या स्थापना दिनानिमित्त सोलापुरात विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करत विरोधकांवर टीका केली. भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष असून कार्यकर्त्यांच्या त्यागातून पक्ष उभा राहिला आहे, असे सांगताना त्यांनी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू असल्याचे नमूद केले. देशातील २२ राज्यांत भाजपचे सरकार असून जनमानसात पक्षाने विश्वास निर्माण केल्याचा दावा त्यांनी केला.बारामती पोटनिवडणुकीबाबत बोलताना गोरे म्हणाले की, सुनेत्रा पवार यांना बिनविरोध निवडून द्यावे ही आमची भावना आहे. काँग्रेसने काय निर्णय घ्यावा हा त्यांचा अंतर्गत विषय असल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसवर दुहेरी भूमिकेचा आरोप केला. बिनविरोध निवडणूक ही परंपरेचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले, मात्र ती झाली नाही तरी सुनेत्रा पवार यांच्या विजयात कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.