Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : प्रशासनाचे दुर्लक्ष, अपुऱ्या शिक्षकांवर अनेक वर्गाचा ताण; गगनबावडा तालुक्यात शिक्षणाचा बोजवारा

तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्याथ्यर्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 06, 2026 | 07:04 PM
Kolhapur News : प्रशासनाचे दुर्लक्ष, अपुऱ्या शिक्षकांवर अनेक वर्गाचा ताण; गगनबावडा तालुक्यात शिक्षणाचा बोजवारा
Follow Us
Follow Us:
  • प्रशासनाचे दुर्लक्ष, अपुऱ्या शिक्षकांवर अनेक वर्गाचा ताण
  • गगनबावडा तालुक्यात शिक्षणाचा बोजवारा
गगनबावडा/ संभाजी सुतार : तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्याथ्यर्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तब्बल 29 पदे रिक्त असून अपुऱ्या शिक्षकांवर अनेक वर्गाचा ताण टाकून शिक्षणाचा गाडा कसाबसा चालवला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यात एकूण 180 मंजूर पदांपैकी केवळ 156 पदे कार्यरत असून उर्वरित पदे अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. डोंगराळ आणि दुर्गम भाग असलेल्या गगनबावडा तालुक्यात आधीच शैक्षणिक सुविधा मर्यादित असताना प्रशासनाने रिक्त पदे भरण्याकडे दुर्लक्ष केल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या केंद्रप्रमुखांच्या 5 पदांपैकी तब्बल 3 पदे रिक्त आहेत. त्यामुळे शैक्षणिक कामकाजाचे नियोजन आणि देखरेख यावरच परिणाम होत आहे. त्याचप्रमाणे गणित-विज्ञान विषयाच्या 15 पदांपैकी 5 पदे रिक्त, तर भाषा विषयाच्या 12 पदांपैकी 7 पदे रिक्त व अतिरिक्त 2पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या विषयांचे नियमित अध्यापन मिळत नसल्याची स्थिती आहे.

Sangali News : कवठेमहांकाळला अतिक्रमणाचा विळखा; नगरपंचायतीच्या सूचनांनंतरही कारवाई ठप्प, नागरिकांचा तीव्र संताप

शालाबाह्य कामांचा वाढता बोजा; गुणवत्तेवर परिणाम
अध्यापक शिक्षकांच्या बाबतीतही परिस्थिती समाधानकारक नाहीं. 153 मंजूर पदांपैकी 139 शिक्षक कार्यरत असून 15 पदे रिक्त असल्यामुळे अनेक शाळामध्ये कमी शिक्षकांवर शिक्षणाची जबाबदारी टाकली जात आहे. काही ठिकाणी एका शिक्षकावर दोन ते चार वर्ग शिकवण्याची वेळ येत आहे.शिक्षकांवर शालाबाह्य कामांचा वाढता बोजा टाकला जात आहे. निवडणुका, जनगणना, विविध सर्वेक्षण, शासकीय मोहिमा अशा कामांमध्ये शिक्षकांना गुंतवून ठेवले जात असल्याने अध्यापनासाठी वेळच उरत नाही. परिणामी विद्याथ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर थेट परिणाम होत असल्याची खंत शिक्षण क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने अद्याप ठोस पावले उचललेली नाहीत. त्यामुळे रिक्त पदे तातडीने भरून शिक्षण व्यवस्थेला बळ द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

शिक्षक समायोजन, पर्यायी व्यवस्थेकडे दुर्लक्ष
तालुक्यात शिक्षण विभागातील रिक्त पदांचा प्रश्न गंभीर असतानाही शिक्षण प्रशासनाकडून ठोस उपाययोजना झालेल्या दिसत नाहीत. रिक्त पदे भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याबरोबरच तात्पुरत्या स्वरूपात शिक्षकांचे समायोजन किंवा पर्यायी व्यवस्था करण्याची गरज होती. मात्र अशा कोणत्या उपाययोजना प्रभावीपणे राबवल्या गेल्या नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. त्यामुळे या परिस्थितीचे खापर आता तालुका शिक्षण प्रशासनावर फुटत असल्याचे भावना व्यक्त होत आहे.

Kolhapur News : नव्या आयुक्तांसमोर भ्रष्टाचार रोखण्याचे आव्हान; वाढत्या 19 निलंबित कर्मचारी

Web Title: Kolhapur news administrations negligence pressure from many classes on insufficient teachers education in gaganbawda taluka in shambles

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 07:04 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Marathi News
  • Sangali News

संबंधित बातम्या

The Odyssey OTT Release: सिनेमाप्रेमींसाठी मोठी अपडेट! क्रिस्टोफर नोलनचा चित्रपट कधी आणि कुठे पाहाल?
1

The Odyssey OTT Release: सिनेमाप्रेमींसाठी मोठी अपडेट! क्रिस्टोफर नोलनचा चित्रपट कधी आणि कुठे पाहाल?

Netflix Top 10 Movies Today: OTT प्रेमींसाठी मोठी अपडेट!  Netflixवर आज जलवा? ‘Cocktail 2’पासून ‘Peddi’पर्यंत टॉप १० चित्रपट ट्रेंड
2

Netflix Top 10 Movies Today: OTT प्रेमींसाठी मोठी अपडेट! Netflixवर आज जलवा? ‘Cocktail 2’पासून ‘Peddi’पर्यंत टॉप १० चित्रपट ट्रेंड

The Exorcist Movie: दोन मुली गायब… आणि सुरू होतो रहस्यमय खेळ! ७१ मिनिटांचा हा भयपट विकेंडला नक्की पाहा
3

The Exorcist Movie: दोन मुली गायब… आणि सुरू होतो रहस्यमय खेळ! ७१ मिनिटांचा हा भयपट विकेंडला नक्की पाहा

LIC Jeevan Umang Plan : कमाल…एलआयसीची ‘ही’ पॉलिसी ऐकली का? दरमहा 5000 गुंतवणुकीवर मिळणार 100 वर्षांपर्यंतचे लाइफ कव्हर
4

LIC Jeevan Umang Plan : कमाल…एलआयसीची ‘ही’ पॉलिसी ऐकली का? दरमहा 5000 गुंतवणुकीवर मिळणार 100 वर्षांपर्यंतचे लाइफ कव्हर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.