गोदरेज एंटरप्राइझेस ग्रुपच्या वतीने तांबाटी येथे एक सुसज्ज व अत्याधुनिक अंगणवाडी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या केंद्रामुळे स्थानिक आदिवासी समुदायातील ६ वर्षांखालील सुमारे ५० बालकांना, ३० गरोदर महिलांना व ५० स्तनपान करणाऱ्या मातांना सुरक्षित व सर्वसमावेशक सुविधा मिळणार आहेत. या उपक्रमाचा उद्देश प्राथमिक शिक्षण, पोषण आणि मातृत्व काळजीच्या माध्यमातून ग्रामीण समाजाची भरभराट साधणे आहे. उद्घाटन सोहळ्याला नायब तहसीलदार सुधाकर राठोड, सरपंच अविनाश आमाले, पोलीस निरीक्षक सचिन पवार आणि गोदरेजच्या सीएसआर प्रमुख अश्विनी देवदेशमुख उपस्थित होते. कार्यक्रमानंतर वृक्षारोपण उपक्रमही राबविण्यात आला.