Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat Panchayat Samiti: कर्जत पं.स. मध्ये महिला सभापती? पुरुषांची मक्तेदारी मोडली जाणार

कर्जत पंचायत निवडणुकीचा निकाल लागून १० दिवस लोटले, मात्र अद्याप सभापती पदाची निवडणूक कधी होणार? हे सरकारच्या ग्रामविकास विभागाने जाहीर केले नाही.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 22, 2026 | 09:45 PM
Karjat Panchayat Samiti: कर्जत पं.स. मध्ये महिला सभापती? पुरुषांची मक्तेदारी मोडली जाणार

Karjat Panchayat Samiti: कर्जत पं.स. मध्ये महिला सभापती? पुरुषांची मक्तेदारी मोडली जाणार

Follow Us
Follow Us:

Karjat Panchayat Samiti: कर्जत पंचायत निवडणुकीचा निकाल लागून १० दिवस लोटले, मात्र अद्याप सभापती पदाची निवडणूक कधी होणार? हे सरकारच्या ग्रामविकास विभागाने जाहीर केले नाही. दुसरीकडे कर्जत पंचायत समिती सभापतीपद ही नागरिकांचा मागास प्रवर्ग असे राखीव असताना बहुमत असलेली कर्जत परिवर्तन विकास आघाडी महिला सदस्यांना सभापती करण्याची चर्चा आहे. या चर्चेमुळे सभापती पद नागरिकांचा मागास प्रवर्ग मधील सर्वसाधारण असताना पुरुष सदस्य यांच्या ऐवजी महिला सदस्यांना देण्याचा घाट आघाडीकडून घाट घातला जात आहे.

दरम्यान, हा नवीन पायंडा पडण्याची शक्यता असून पुरुष सदस्यांमध्ये नाराजी पसरली आहे. इच्छुक पुरूष सदस्यांच्या मनात धडकी भरली असून पुरुषांची मक्तेदारी मोडण्याचा प्रयत्न कर्जत परिवर्तन आघाडीचे नेते करीत असल्याने त्या निर्णयाचे मोठे दुष्परिणाम आघाडीला भविष्य काळात भोगावे लागू शकतात.

कलाकारांच्या सुरेल सादरीकरणाला प्रेक्षकांकडून भरभरून दाद! ‘मराठी पाऊल पडते पुढे’ सोहळ्याला बुलढाण्यात प्रतिसाद

पंचायत समितीत १२ सदस्यांमध्ये परिवर्तन आघाडीचे १०, महायुतीचे २ सदस्य निवडून आले. पहिली अडीच वर्षे सभापती पद हे ना.मा.प. राखीव आहे. परिवर्तन आघाडीचे बहुमत असल्याने आघाडीचा उमेदवार सभापती होणार हे देखील नक्की आहे. महिला आरक्षण नसेल तर शक्यतो महिला सदस्यांचा त्या पदासाठी विचार होत नाही, हा राजकारणात एक पायंडा दिसतो. त्यामुळे विजयी उमेदवार भगवान चंचे, महेश खारीक आणि नितीन धुळेंची चर्चा आहे.

नमिता घारे यांच्याकडे कुणबी जातीचे ओबीसी प्रमाणपत्र असल्याने त्या नागरिकांचा मागास प्रवर्ग गटासाठी राखीव असलेल्या सभापती पदावर विराजमान होऊ शकतात. पण राजकारणात पुरुषांसाठी असलेल्या जागेवर महिला सदस्यांना संधी देऊन पदाधिकारी बनवले जात नाही, असा अलिखित नियम असताना नमिता घारेना कर्जत परिवर्तन आघाडीचे गटनेते केल्याने पुरुष सदस्य नाराज झाले असल्याचे बोलले जात आहे.

पनवेलकरांनोsss आता तुमची शॉपिंग होईल अजूनच भारी! द्वारकाधीश शॉपिंग सेंटर मॉलचे अभिनेत्री अक्षया देवधरच्या हस्ते उद्घाटन

दुसरीकडे आता सभापती पदावर पुरुष सदस्याला बसवण्याऐवजी महिला सदस्या नमिता घारे यांना सभापती केले जाईल असे सुतोवाच आघाडी मधील कार्यकर्ते करीत आहेत. त्यांचा थेट परिणाम राजकीय पटलावर पडू शकतो आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग मध्ये दावेदार असलेले पुरुष सदस्य नाराज होऊ शकतात. सभापती पदांसाठी एका विशिष्ट जातीच्या सदस्यांना सभापती मिळू नये म्हणून महिला सदस्यांना सभापतीचा प्रयत्न आहे.

Web Title: Women chairperson in karjat panchayat samiti will the monopoly of men be broken

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • Karjat
  • Panchayat Samiti Election
  • raigad

संबंधित बातम्या

Raigad News: ‘मुक्तांगण’च्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी फोडली दहीहंडी; गोविंदा गीतांवर धरला ठेका, प्रांगणात रंगला जल्लोष
1

Raigad News: ‘मुक्तांगण’च्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी फोडली दहीहंडी; गोविंदा गीतांवर धरला ठेका, प्रांगणात रंगला जल्लोष

Raigad News: महाडमध्ये दहीहंडीचा थरार! १ लाख ५१ हजारांच्या बक्षिसासाठी गोविंदा पथकांमध्ये रंगणार जोरदार चुरस
2

Raigad News: महाडमध्ये दहीहंडीचा थरार! १ लाख ५१ हजारांच्या बक्षिसासाठी गोविंदा पथकांमध्ये रंगणार जोरदार चुरस

Sudhakar Ghare Arrest: महाएल्गार आंदोलनापूर्वी सुधाकर घारे यांना अटक; खालापूरमधून अलिबागला नेल्याने कार्यकर्ते संतप्त
3

Sudhakar Ghare Arrest: महाएल्गार आंदोलनापूर्वी सुधाकर घारे यांना अटक; खालापूरमधून अलिबागला नेल्याने कार्यकर्ते संतप्त

Raigad News: रायगडच्या मतदार यादीत मोठी तफावत; ५ लाख ८४ हजार गणना प्रपत्रांचे संकलनच अपूर्ण
4

Raigad News: रायगडच्या मतदार यादीत मोठी तफावत; ५ लाख ८४ हजार गणना प्रपत्रांचे संकलनच अपूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.