कोल्हापूर जिल्ह्यात आज काहीअंशी पावसाची उघडझाप सुरू आहे..मात्र गेली दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने पंचगंगेच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.त्यामुळे इशारा पातळीवरूंन वाहणाऱ्या पंचगंगेनं आज धोका पातळी गाठली आहे.. आज दुपारी 4 वाजता कोल्हापूरातील राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणीपातळी 43 फूट 3 इंचावर पोहचली असून जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.त्यामुळे जिल्हा आणि महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आलं असून पूरबाधित नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.. दरम्यान आज दिवसभर जिल्ह्यात पावसाची उघडझाप असल्याने राधानगरी धरणाचे सुरू असणारे सर्व दरवाजे बंद झाले असून सध्या फक्त धरणाचा एक दरवाजा सुरू आहे.. तसचं कोल्हापूर – गगनबावडा मार्गावरील पुराचं पाणी कमी झाल्याने हा मार्ग सुरू करण्यात आला आहे..परंतु कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गावर केर्ली , रजपूतवाडी या ठिकाणी रस्त्यावर पाणी असल्याने हा मार्ग प्रशासनाने बंद केला आहे.. आणि पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे.पावसाचा जोर कमी असल्याने सध्या कोल्हापुरला पूरस्थिती पासून दिलासा मिळाला आहे.. मात्र पावसाचा जोर वाढल्यास कोल्हापूरला पूरस्थिती निर्माण होवू शकते. त्यामुळे जिल्हा प्रशासन अर्लट मोडवर आलं आहे.