कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील कोलोली गावात दिवाळीचा सण सामान्य पद्धतीने साजरा केला जात नाही. देशभरात आज दिवाळी उत्साहात साजरी होत असतानाच, या गावात हा सण पारंपरिक पद्धतीने, अमावस्येनंतर एक महिन्यांनी साजरी होतो, ज्याला स्थानिक लोक ‘देव दिपावली’ म्हणतात. ही परंपरा गेल्या अनेक शतकांपासून कायम आहे. गावातील नागरिक आपल्या रोजच्या कामात व्यस्त असतात, त्यामुळे दिवाळीच्या सणात पावण्यांकडून आणि मित्र परिवाराकडून आलेला फराळ खाल्ला जातो. कोलोली गावाची ग्रामदेवता श्री गाडाई देवी असून तिचे पूरातन मंदिर गावच्या मध्यवर्ती भागात आहे. देव दिपावलीच्या दिवशी गावकरी नवीन कपडे आणि विविध वस्तू खरेदी करतात, तसेच घरासमोर आकाशकंदील लावून हा सण साजरा करतात. या कारणास्तव कोलोली गाव कदाचित देशभरातील एकमेव असे गाव आहे जिथे पारंपरिक दिवाळी ऐवजी अमावस्येनंतर देव दिपावली साजरी केली जाते.