शैक्षणिक कर्ज घेऊन शिकणाऱ्या कोल्हापूरातील शेतकरी पुत्रानं एआयच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण Sifra एआय टूल बनवलंय.शिवाय भारत सरकारकडूनही त्याला मान्यता मिळाली आहे.. संशोधन, व्यवसाय निर्मिती, आणि माहिती विश्लेषण करण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञानातील माध्यमांचा वापर करावा लागतो.एकाच वेळी ही तंत्रज्ञानं वापरणं जिकिरीचं होतं.त्यामुळे यातून अपेक्षित उद्देशापर्यंत पोहोचण्यासाठी संशोधक व्यावसायिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. याचाच विचार करून कोल्हापुरातील डॉ. डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी संकेत सर्जेराव पाटील याने एआयच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण टुल विकसित केलं आहे.या टूलमधून डेटा विश्लेषण, दृश्यांकन मशीन लर्निंग मॉडेल करण्यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे.दरम्यान या संशोधनासाठी भारत सरकारकडून नुकतचं संकेत पाटील याला कॉपीराईट प्रमाणपत्रही मिळालं आहे.शेतकरी कुटुंबातील असलेला संकेत डेटा सायन्स इंजिनिअरिंगच्या चौथ्या वर्षात शिकतोय.विशेष म्हणजे शैक्षणिक कर्ज घेऊन त्यानं शिक्षण पूर्ण करण्याचा मानस ठेवला आहे.