शिवाजी पोवार आणि सतेज पाटलांमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे. रॉयल्टी बुडवून नाही तर कष्टाने हेलिकॉप्टर घेतलयं, असा टोला देखील शिवाजी पोवारांनी सतेज पाटलांना लगावला आहे. खण उत्खननाच्या पैशातून किंवा रॉयल्टी बुडवून नाही तर कष्टाने 10 कोटींच कर्ज काढून घेतलं आहे..शिवाय टोप , कासारवाडी इथल्या खण उत्खनन प्रकरणी मला प्रशासनाकडून एकही नोटीस आलेली नाही..त्यामुळे आमदार सतेज पाटील यांनी केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, असं स्पष्टीकरण रस्ते विकास व्यावसायिक शिवाजी पोवार यांनी दिलं आहे.आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी विधानपरिषदेत टोप परिसरातील खण उत्खननाचा मुद्दा मांडताना उत्खनन करणारा हेलिकॉप्टर घेवू शकतो तर शासनाला किती पैसे मिळतील असा प्रश्न करत रॉयल्टीचा ही मुद्दा उपस्थित केला होता.सतेज पाटील यांनी कोणाचही नाव घेतलं नसतानाही शिवाजी पोवार यांनी पत्रकार परिषद घेवून स्पष्टीकरण दिलं आहे. सतेज पाटील यांनी चुकीच्या माहितीनुसार आरोप केले आहेत. 2014 पासून ती खाण महापालिकेच्या ताब्यात असून ती बंद असल्याचं शिवाजी पोवार यांनी म्हटलं आहे.दरम्यान टोप – कासारवाडी इथल्या खडी – क्रशर यंत्रणेची तपासणी करत पर्यावरण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेकायदेशीर 37 क्रशर सील महसूल विभागाने सील केलेतं.त्यामुळे सध्या जिल्ह्यात हेलिकॉप्टरचा विषय चांगलाच चर्चेत आला आहे.