कोल्हापूरात महापालिका प्रशासनाकडून निवडणूक भत्ता मिळाला नसल्याने आज भारतीय मजदूर संघाच्या वतीने आशा सेविकांनी आंदोलन केलंय. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत 275 आशा सेविकांनी वैद्यकीय सेवेचं काम केलं आहे. मात्र अजूनही या आशा सेविकांना निवडणूक भत्ता मिळालेला नाही.त्यामुळे याच्या निषेधार्थ आज आशा सेविकांनी महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन करून प्रशासनाचं लक्ष वेधलयं.यावेळी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. दरम्यान जोपर्यंत निवडणूक भत्ता मिळत नाही.तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा आशा सेविकांनी दिलायं.