कोल्हापूरात आज महायुतीच्या 45 नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी नूतन नगरसेवकांचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.शिवाय कोल्हापूर शहराचा विकास करण्यासाठी एकजूटीने काम करण्याचा सल्ला दिला.मात्र वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफांनी मी यातील पुराणा खेळाडू म्हणत नगरसेवकांसह नेत्यांना चांगलाच कानमंत्र दिलायं.कोल्हापूर महापालिकेत रोजच्या रोज काहीतरी भानगडी असतात.भानगडी म्हणजे काहीतरी घटना घडतात.बातम्या येतात.त्यामुळे आपली प्रत्येक बातमी चुकीची किंवा वाईट आलीचं पाहिजे हे टाळलं पाहिजे.सभागृहात बोलताना प्रत्येक नगरसेवकांनं काळजी घेणं गरजेचं आहे.सभागृहात मिटींग होण्यापूर्वी पार्टी मिटींग होईल.त्याच्या आधीचं काय भांडायचं..मारायचं. खुर्च्या फेकायच्या फेका.मात्र जनरल सभेत सर्वांमते ठरलंय तेचं मंजूर करायचं.तिन्ही पक्षाच्या बदनामीला कसलाही वाव द्यायचा नाही असा कानमंत्र हसन मुश्रीफांनी दिलायं.