Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : जिल्ह्यात बिबट्यांचा सुळसुळाट; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

तालुक्यातील येलूर व कुंडलवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर लक्षणीयरीत्या वाढला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 02, 2026 | 06:42 PM
Kolhapur News : जिल्ह्यात बिबट्यांचा सुळसुळाट; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Follow Us
Close
Follow Us:
  • वाळवा, शिराळा तालुक्यात बिबट्यांची वाढती दहशत
  • ग्रामस्थांमध्ये भीतीचं सावट
कोल्हापूर : तालुक्यातील येलूर व कुंडलवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर लक्षणीयरीत्या वाढला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्‌याने पाळीव शेळ्या-मेंढ्यांवर हल्ले करून त्यांना ठार मारल्याच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी चालत्या वाहनांवर झेप घेण्याचे धाडस केल्याने प्रवाशांच्या जीवितासही धोका निर्माण झाला आहे. तसेच शिराळा तालुक्यात बिबट्यांची संख्या आणि वावर लक्षणीय वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांत जनावरांवर हल्ल्यांच्या घटना वाढल्या असून शेतीकामावरही त्याचा परिणाम होत आहे. डोंगर, रान आणि उसाच्या शेतांमध्ये बिबट्यांचा मुक्त वावर वाढल्याने शेतकऱ्यांना शेतात काम करणे.

वनविभागाकडे सक्षम अधिकारी, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि आधुनिक यंत्रसामग्रीचा अभाव
स्थानिक नागरिक आणि शेतकरी यांनी वनविभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. बिबट्यांचा बंदोवस्त करावा, पिंजरे लावावेत तसेच चांदोली अभयारण्य परिसरात प्रभावी कुंपण उभारावे, अशी मागणी होत आहे. दरम्यान, शिराळा वनविभागाकडे सक्षम अधिकारी, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि आधुनिक यंत्रसामग्रीचा अभाव असल्याची टीका होत आहे. हल्ल्यांच्या घटना घडल्यानंतरच हालचाली केल्या जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

वावर परिसरात तात्काळ पिंजरे लावण्यात यावेत : राहुलदादा महाडिक
येलूर परिसरातील परिस्थतीत्या पार्श्वभूमीवर वन विभाग व शासनाने तातडीने आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी जिल्हा बँकेचे संचालक राहुलदादा महाडिक यांनी केली आहे. परिसरातील संतप्त ग्रामस्थांनी राहुलदादा महाडिक यांची भेट घेऊन बिबट्याच्या वाढत्या उपद्रवाबाबत निवेदन सादर केले. ग्रामस्थांच्या मागण्यांची गंभीर दखल घेत महाडिक यांनी तातडीने वन विभाग, स्थानिक आमदार, खासदार तसेच संबंधित मंत्री महोदयांकडे पाठपुरावा सुरू केला आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी परिसरात्त तात्काळ पिंजरे लावावेत, रात्रीची गस्त वाढवावी आणि संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.

शिराळा तालुक्यात ६०० हून अधिक बिबटे व पिलांचा वावर
शिराळा तालुक्यात सुमारे ६०० हून अधिक बिबटे व त्यांच्या पिलांचा वावर असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उसतोडीच्या हंगामात उसाच्या फडात लपून बसलेले बिबटे अचानक समोर येत असल्याने मजूर आणि शेतकरी धास्तावले आहेत. काही ठिकाणी मानवी वस्तीजवळही बिबटे दिसून आल्याच्या घटना घडल्या आहेत. अलीकडेच काही गावांमध्ये जनावरांवर हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे पशुपालकांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच काही दिवसांपूर्वी एका बालकावर हल्ल्याची घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. ज्या ठिकाणी हल्ला झाला, त्या परिसरात पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Kolhapur News : जनतेच्या घामाचा पैसा, लाचखोरांच्या घशात! प्रशासन अधिकारीच भ्रष्ट, नागरिकांनी कोणाकडे मागावा न्याय?

पशुपालकांच्या भरपाईसह शेतीपंपांना दिवसा वीज द्या
विबट्याच्या हल्ल्यात नुकसान झालेल्या पशुपालकाना शासनाकडून त्वरित व भरीव भरपाई मिळवून देण्यासाठी आपण वरिष्ठ पातळीवर प्रयत्नशील असल्याचे आश्वासन महाडिक यांनी ग्रामस्थांना दिले, बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात पाणी देण्यासाठी जाण्यास घाबरत आहेत. शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याने येलूर कुंडलवार परिसरातील शेती पंपांचा वीजपुरवठा रात्रीऐवजी दिवसा करावा, अशी ठाम मागणी राहुलदादा महाडिक यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.

Kolhapur News : विक्री प्रमाणपत्रसाठी भाडेवाढ, फेरीवाल्यांचं होतंय आर्थिक शोषण; संतप्त संघटनेचं महापौरांना साकडं

Web Title: Leopards are roaming in the district the issue of safety of citizens is on the agenda

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 05:32 PM

Topics:  

  • kolhapur news
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Pratap Sarnaik : मीरा-भाईंदरचे राजकारण तापले; आरोप-प्रत्यारोपांची पातळी घसरली, सरनाईक-मेहता आमनेसामने
1

Pratap Sarnaik : मीरा-भाईंदरचे राजकारण तापले; आरोप-प्रत्यारोपांची पातळी घसरली, सरनाईक-मेहता आमनेसामने

Hassan Mushrif : गोकुळ भ्रष्टाचाराचा पैसा भाजपविरोधात? शिवाजीराव पाटील यांचा मुश्रीफांवर गंभीर आरोप
2

Hassan Mushrif : गोकुळ भ्रष्टाचाराचा पैसा भाजपविरोधात? शिवाजीराव पाटील यांचा मुश्रीफांवर गंभीर आरोप

Solapur News : एलपीजी दरकपातीसाठी सोलापूरचे रिक्षाचालक रस्त्यावर; ‘सोलापूर बंद’चा इशारा
3

Solapur News : एलपीजी दरकपातीसाठी सोलापूरचे रिक्षाचालक रस्त्यावर; ‘सोलापूर बंद’चा इशारा

Parbhani : पडेगावात पुतळ्यावरून हायव्होल्टेज ड्रामा! 35जण पोलिसांच्या ताब्यात 
4

Parbhani : पडेगावात पुतळ्यावरून हायव्होल्टेज ड्रामा! 35जण पोलिसांच्या ताब्यात 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.