Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Israel War: ‘नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी…’; काय म्हणाले प्रकाश आबिटकर?

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी माहिती दिली की, प्रशासन परदेशात अडकलेल्या नागरिकांच्या सतत संपर्कात असून, याबाबतचा दैनंदिन आढावा घेऊन शासनास कळविण्यात येत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 03, 2026 | 09:19 PM
Iran Israel War: ‘नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी…’; काय म्हणाले प्रकाश आबिटकर?
Follow Us
Follow Us:

मिडल ईस्ट युद्धामुळे अनेक भारतीय परदेशात अडकले
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व यंत्रणा सतर्क
नागरिकांच्या सुटकेसाठी शासन स्तरावर आढावा बैठक

कोल्हापूर: इराण आणि इस्रायल या देशांमधील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांत कोल्हापूर जिल्ह्यातील काही नागरिक अडकले आहेत. या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि मदतीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व यंत्रणा सतर्क आहेत, अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

आखाती देशांमध्ये अडकलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षित सुटका आणि त्यांच्या घरवापसीसाठी शासन स्तरावर सुरू असलेल्या कार्यवाहीचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात घेण्यात आला. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ व इतर मान्यवर उपस्थित होते.

Eknath Shinde : उपमुख्यमंत्र्यांची अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी पायपीट, विशेष विमानांची केली व्यवस्था

यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, जिल्हा प्रशासनाने तिकडे अडकलेल्या नागरिकांशी सतत संपर्क ठेवावा. केंद्र व राज्य शासनाच्या समन्वयाने जिल्ह्यातील अडकलेले नागरिक, पर्यटक, नोकरीनिमित्त गेलेले व्यक्ती आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षित परतीचे नियोजन केले जात आहे. ज्यांचे कुटुंबीय परदेशात अडकले आहेत त्यांनी घाबरून जाऊ नये. ज्यांचे नातेवाईक परदेशात आहेत, त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या हेल्पलाइनशी संपर्क साधून त्यांची माहिती द्यावी. जिल्ह्यात यासाठी स्वतंत्र संपर्क कक्ष व विशेष कक्ष सुरू करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासन आवश्यक मदतीसाठी सज्ज असून नागरिकांनी प्रशासनाशी समन्वय ठेवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

इराण आणि इस्रायलमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांत अडकलेल्या नागरिकांची माहिती पुढीलप्रमाणे आहे: यामध्ये दुबई येथे पर्यटनासाठी गेलेले १५९ पर्यटक; कतार, दुबई, इराण, इस्रायल, मोरोक्को, सौदी अरेबिया, शारजाह, कुवेत, बहरीन आणि ओमान येथे नोकरीनिमित्त गेलेले ३९ नागरिक; कतार, शारजाह व बहरीन येथे नोकरीनिमित्त गेलेल्या कुटुंबातील ७ सदस्य आणि दुबई येथे शिक्षण व प्रशिक्षणासाठी गेलेले २ असे एकूण २०७ नागरिक अडकले आहेत. यांपैकी पर्यटनासाठी गेलेले २३ नागरिक जिल्ह्यात सुखरूप परतले आहेत. तर दि. ५ मार्च २०२६ रोजी ८० नागरिक दुबईहून निघणार असून ते ६ मार्च २०२६ रोजी जिल्ह्यात पोहोचतील.

Pune-Mumbai महामार्गवारील वाहतूक कोंडीवर पर्याय निघणार? ‘या’ मार्गाचा प्रस्ताव चर्चेत

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी माहिती दिली की, प्रशासन परदेशात अडकलेल्या नागरिकांच्या सतत संपर्कात असून, याबाबतचा दैनंदिन आढावा घेऊन शासनास कळविण्यात येत आहे.

उपमुख्यमंत्र्यांची महाराष्ट्रातील अडकलेल्या नागरिकांसाठी पायपीट

इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावामुळे मध्य पूर्वेतील हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे. यामुळे अनेक महाराष्ट्राचे नागरिक दुबई आणि युएईमध्ये अडकले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडकलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी तातडीने पावले उचलली आहेत. त्यांनी अडकलेल्या महाराष्ट्राच्या नागरिकांशी वैयक्तिकरित्या संपर्क साधला आणि त्यांच्या सुरक्षित परतीसाठी विशेष विमानांची व्यवस्था केली. या प्रयत्नांमुळे, आज दुपारी (मंगळवार, ३ मार्च) स्टार एअरच्या दोन विशेष विमाने फुजैराह विमानतळावरून रवाना होतील.

Web Title: Prakash abhitkar said kolhapur district administration on alert for safety of citizens stranded in iran israel world war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 09:19 PM

Topics:  

  • Iran Israel Conflict
  • kolhapur news
  • Prakash Abitkar
  • World War 3

संबंधित बातम्या

भारतासह चीनी कंपन्या अडचणीत, Russia सोबत संबंधांमुळे तणावात?  युरोपियन युनियनची काय घोषणा?
1

भारतासह चीनी कंपन्या अडचणीत, Russia सोबत संबंधांमुळे तणावात? युरोपियन युनियनची काय घोषणा?

किती अवलंबून राहणार होर्मुझवर? 30 वर्षांपासून अडकून होता… आता गुजरातपासून ओमानपर्यंत  भारत करणार ‘हे’ कामं
2

किती अवलंबून राहणार होर्मुझवर? 30 वर्षांपासून अडकून होता… आता गुजरातपासून ओमानपर्यंत भारत करणार ‘हे’ कामं

पेट्रोल – डिझेलचे दर धडाधड कोसळणार… भारतासाठी आली Good News, जुलैनंतर असं काय घडू शकतं ?
3

पेट्रोल – डिझेलचे दर धडाधड कोसळणार… भारतासाठी आली Good News, जुलैनंतर असं काय घडू शकतं ?

Russia Ukraine War: पुतिन यांनी चर्चेचा प्रस्ताव फेटाळताच युक्रेनचा थरकाप उडवणारा प्रहार; अझोव समुद्रात रशियाची 5 जहाजे उडवली
4

Russia Ukraine War: पुतिन यांनी चर्चेचा प्रस्ताव फेटाळताच युक्रेनचा थरकाप उडवणारा प्रहार; अझोव समुद्रात रशियाची 5 जहाजे उडवली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.