आषाढी एकादशीच्या निमित्ताने लातूर सायकलिस्टस् क्लबच्यावतीने आयोजन करण्यात आलेल्या यंदाच्या पंढरपूर सायकल वारीने विठू माऊलीचा जयघोष करीत आज पहाटे पाच वाजता लातूरहून पंढरपूरकडे प्रस्थान केले… लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या उपस्थितीत या सायकल वारीला सुरुवात झाली… गेल्या चार वर्षांपासून क्लबच्या वतीने पर्यावरणपूरक पंढरपूर सायकल वारी काढण्यात येत आहे.. पर्यावरण बचावचा संदेश घेऊन निघालेली ही सायकल वारी लातूर ते पंढरपूर या १९१ किलोमीटरच्या अंतरात जनजागृती करणार आहे. यंदाच्या वारीत जवळपास १५५ सायकलपटू सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे खा. डॉ शिवाजी काळगे यांनीही काही अंतरापर्यंत सायकल चालवित या वारीत सहभागी नोंदविला.. पंढरपूरमध्ये गेल्या चार वर्षांपासून सायकल रिंगण सोहळा आयोजित करण्यात येत आहे… यंदाच्या सोहळ्याचे यजमानपद लातूरला देण्यात आले आहे..येत्या २२ जुलैला पंढरपुरात यंदाचा सायकल रिंगण सोहळा पार पडणार असून, या सोहळ्यात लातुरातील १५५ सायकलिस्ट बरोबरच राज्यातील ९७ क्लबचे जवळपास ५ हजार सायकलस्वार सहभागी होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.