शक्तीपीठ महामार्ग हा राज्यातील मंत्र्यांचा ड्रिम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. निवडणुकीआधी याच मंत्र्यांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचे आश्वासन राज्यातील शेतकऱ्यांना दिले होते. मात्र निवडणुकीनंतर पहिली घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाची केल्याने शेतकरी संघटना व राजकीय पक्ष यांचा कडाडून विरोध राज्यभरात होतो आहे. राज्यातील बारा जिल्ह्यातून हा महामार्ग जातो आहे जिल्ह्यातील शेतकरी एकत्र येऊन याला विरोध करत आहेत. एक जुलै रोजी भूमी अधिग्रहणाचा पहिला टप्पा सरकारने केला होता यानंतर आज पुन्हा एकदा दुसरा टप्प्याच्या मोजणीची सुरुवात होणार होती मात्र शेतकऱ्यांनी शेतात जाण्याच्या आधीच अधिकाऱ्यांना अडवले व मोजणी करायचे नाही असे सुनावले.