शक्तीपीठ महामार्गावरुन राजेश क्षीरसागर आणि राजू शेट्टींमध्ये चांगलीच जुंफली आहे.माजी खासदार राजू शेट्टी कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकात नसलेल्या जमीनीचे सातबारे घेऊन दाखल झाले आहेत.
महाराष्ट्रातील प्रस्तावित नागपूर- गोवा शक्तीपीठ महामार्गाला राज्यभरातून विरोध होत आहे. त्यासाठी अनेक संघटनांकडून आंदोलनेही करण्यात आली. तर काँग्रेसकडूनही या महामार्गाला विरोध केला जात आहे.
शक्तीपीठ या महत्त्वकांशी महामार्गाच्या प्रकल्पाला सुरुवातीपासून शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. तरी देखील सरकार हा करण्यासाठी ठाम आहेत. आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी आंदोलन केले.
मुंबईतील विधानभवनावर १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समनव्यक गिरीश फोंडे यांनी रविवारी दिली.