मालेगाव येथील साडेतीन वर्षाच्या मुली बरोबर घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ सोलापुरात आक्रोश व्यक्त करण्यात आला. सोलापुरात चार हुतात्मा पार्क चौक येथे रोपीच्या पोस्टरला दगडाने ठेचून ते पोस्टर जाळत संभाजी ब्रिगेड महिला आघाडीने आक्रोश व्यक्त केला. पीडित बालिकेच्या वडिलांशी झालेल्या किरकोळ वादातून आरोपीने पीडितेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आलीय. चॉकलेटचे आमिष दाखवून अत्याचार केला हा निंदनीय प्रकार संबंधित आरोपींनी केला आहे. ही घटना अगदी निंदनीय आहे. देशातील आणि राज्यातील गृह खाते हे काय करतेय. येणाऱ्या काळात अशा आरोपींवरील आरोप सिद्ध झाल्यानंतर त्याला अटक करून कोर्टात नेण्याऐवजी तात्काळ त्याला फाशी देण्यात यावी अशी मागणी महिला आघाडीच्या अध्यक्षा मीनल दास केली.