ऑनलाइन शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून 1 कोटी 8 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला असून, या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे 61 वर्षीय नागरिक असून काँग्रेस नगर परिसरात राहतात. पोलिसांच्या माहितीनुसार, काही अज्ञात व्यक्तींनी इंटरनेटवरून जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीकडून विविध मोबाईल क्रमांक आणि बँक खात्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या तारखांना एकूण ₹1.08 कोटी इतकी रक्कम घेतली. मात्र, पैसे घेतल्यानंतर ना नफा मिळाला, ना मूळ रक्कम परत करण्यात आली.