वाशीमध्ये गणेशोत्सवाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले असून, नवसाला पावणारा महाराज कृष्ण महालात थाटामाटात विराजमान झाले आहेत. या उत्सवाचे हे 41 वे वर्ष असून, माजी स्थायी समिती सभापती संपत शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली मंडळाने भव्य तयारी केली आहे. यावेळी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी नाईक कुटुंबासह बाप्पाचे दर्शन घेतले व मनोभावे आरती केली. त्यांच्यासोबत माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक आणि माजी महापौर सागर नाईक यांचीही उपस्थिती होती. नाईक कुटुंबाच्या उपस्थितीने उत्सवाला विशेष रंगत आली असून, गणेशोत्सवाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या.