Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai : महावितरण संपाचा नागरिकांना फटका , जाणूनबुजून वीजपुरवठा बंद केल्याचा आरोप

महावितरणच्या खाजगीकरण आणि पुनर्रचनेच्या निर्णयाविरोधात महानिर्मितीच्या वीज कर्मचाऱ्यांनी बंडखोरीचे निशाण फडकावले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 10, 2025 | 02:27 PM

Follow Us

महावितरणच्या खाजगीकरण आणि पुनर्रचनेच्या निर्णयाविरोधात महानिर्मितीच्या वीज कर्मचाऱ्यांनी बंडखोरीचे निशाण फडकावले आहे. राज्यभरातील सात प्रमुख वीज कर्मचारी संघटनांनी एकत्र येत संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली तीन दिवसांचा लाक्षणिक संप सुरू केला आहे. हा संप राज्यभर परिणामकारक ठरत असून अनेक ठिकाणी वीजपुरवठा विस्कळीत झाल्याचे चित्र दिसत आहे. या संपाचा फटका सर्वसामान्य जनतेला बसताना दिसत आहे. नवी मुंबईतील सिवूड्स आणि करावे गाव या परिसरांमध्ये जाणूनबुजून वीजपुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला. विशेषतः शालेय परीक्षा सुरू असताना अशा प्रकारचे वागणूक विद्यार्थी आणि पालकांना अडचणीत टाकणारी ठरली आहे. महावितरण कर्मचाऱ्यांकडून मुद्दाम फॉल्ट निर्माण करून नागरिकांना त्रास दिला जात असल्याचे आरोपही करण्यात येत आहेत.या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिक , सामाजिक कार्यकर्ते आणि माजी लोकप्रतिनिधींनी थेट महावितरणच्या कार्यालयात धाव घेतली अन् अधिकाऱ्यांचा घेराव घालत आपला निषेध नोंदवला आणि वीजपुरवठा त्वरित सुरळीत करण्याची मागणी केली. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण देण्याची मागणी होत असून, जर जाणूनबुजून नागरिकांना त्रास दिला गेला असे आढळल्यास कडक कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी आता जोर धरू लागली आहे.

Close

Follow Us:

Web Title: Navi mumbai mahavitaran strike hits citizens allegation of deliberate power cut

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2025 | 02:27 PM

Topics:  

  • Mahavitaran Department
  • Navi Mumbai
  • Power Supply

संबंधित बातम्या

Navi Mumabai : वनविभाग ठरलं अपयशी ; ठोस पुराव्यांअभावी बिवलकरांना क्लीनचीट
1

Navi Mumabai : वनविभाग ठरलं अपयशी ; ठोस पुराव्यांअभावी बिवलकरांना क्लीनचीट

CIDCO Lottery: नवी मुंबईत रेडी-टू-मूव्ह फ्लॅट खरेदी करण्याची संधी; सरकार २,५०,००० ची सबसिडी देणार, कसं अर्ज करू शकता जाणून घ्या…
2

CIDCO Lottery: नवी मुंबईत रेडी-टू-मूव्ह फ्लॅट खरेदी करण्याची संधी; सरकार २,५०,००० ची सबसिडी देणार, कसं अर्ज करू शकता जाणून घ्या…

३२६४ कुटुंबांच्या सुरक्षिततेविरुद्ध ‘राजकीय स्वार्थ’ नडला! घनसोली सिम्प्लेक्स माथाडी वसाहतीच्या पुनर्विकासाची लढाई शिगेला
3

३२६४ कुटुंबांच्या सुरक्षिततेविरुद्ध ‘राजकीय स्वार्थ’ नडला! घनसोली सिम्प्लेक्स माथाडी वसाहतीच्या पुनर्विकासाची लढाई शिगेला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.