Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Crime: वॉर्डबॉय ‘डॉक्टर’ बनून केला उपचार, चुकीच्या इंजेक्शनमुळे 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

नवी मुंबईतील वाशी येथे वॉर्डबॉयने डॉक्टर असल्याचे भासवून तरुणीला चुकीचे इंजेक्शन दिल्याने तिचा मृत्यू झाला. प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 09, 2026 | 08:58 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • वाशी येथे बनावट डॉक्टरकडून उपचार
  • चुकीचे इंजेक्शन दिल्यानंतर तरुणीचा मृत्यू
  • उपचारासाठी 15 हजार रुपये घेतल्याचा आरोप
नवी मुंबई: नवी मुंबई येथून एक धक्कादायक आणि वैधकीय क्षेत्राला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका वॉर्डबॉयने डॉकटर असल्याचे भासवून एका २१ वर्षीय तरुणीला चुकीच्या इंजेक्शन देण्यात आला. या इंजेकशनमुळे त्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रचिती भिकुराम भुवड (वय 21) असे त्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी वाशी पोलिसांनी संदेश पाष्टे (वय 30) याला अटक केली आहे.

Chhatrapati Sambhajinagar: बेकायदेशीर पिस्तूल हातात… ट्रिगर दाबताच सुटली गोळी; क्षणभराची मस्ती ठरली जीवघेणी!

वॉर्डबॉय स्वतःची ओळख ‘डॉक्टर’ सांगायचा

आरोपी संदेश पाष्टे हा मूळचा मानखुर्दचा रहिवासी असून तो अंधेरी येथील एका नर्सिंग होममध्ये केवळ वॉर्डबॉय म्हणून काम करतो. मात्र त्याच्याकडे कोणतेही वैधकीय पदवी नसतांना त्याने मानखुर्द आणि आसपासच्या परिसरात तो स्वतःची ओळख ‘डॉक्टर’ म्हणून करून द्यायचा आणि रुग्णांवर उपचार करायचा.

प्रचिती सोबत काय घडलं?

प्रचितीला हार्मोनल आजार होता. त्यामुळे तिच्या वडिलांनी ओळखीच्या माध्यमातून संदेश पाष्टेला उपचारासाठी घरी बोलावले होते. 5 फेब्रुवारी रोजी संदेश प्रचितीच्या घरी गेला. त्याने तिला पहिले इंजेक्शन दिले. त्यानंतर तिला त्रास होऊ लागला. त्याने पुन्हा दुसरे इंजेक्शन टोचले. दुसऱ्या इंजेक्शननंतर काही वेळातच प्रचितीची प्रकृती प्रचंड खालावली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

उपचारासाठी घेतले १५ हजार

एवढेच नाही तर त्याने उपचारासाठी चक्क 15 हजार रुपये फी प्रचितीच्या कुटुंबियांकडून घेतली होती. मात्र प्रत्यक्षात जर पाहायचं झालं तर या इंजेक्शनची किंमत 500 ते 1000 रुपयांच्या दरम्यान असते.

आरोपी अटकेत

तरुणीचा मृत्यू तिच्या वडिलांना संशयास्पद वाटला, त्यामुळे वडील भिकुराम भुवड यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी 6 फेब्रुवारी रोजी आरोपीला बेड्या ठोकल्या. प्रचितीला नेमकी कोणती औषधे टोचण्यात आली, याचा तपास पोलीस करत आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

पोलिसांचे आवाहन

नागरिकांनी उपचार घेताना संबंधित व्यक्तीची शैक्षणिक पात्रता आणि पदवीची शहानिशा करावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Pune Crime : पुण्यात तरुणावर कोयत्याने सपासप वार; पोलिसांनी गुन्हेगाराला सापळा रचून पकडले

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: नवी मुंबईतील वाशी येथे.

  • Que: आरोपी कोण होता?

    Ans: वॉर्डबॉय असून डॉक्टर असल्याचे भासवत होता.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपीला अटक करून तपास सुरू केला.

Web Title: Navi mumbai crime a ward boy posed as a doctor and administered treatment a 21 year old woman died due to a wrong injection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 08:58 AM

Topics:  

  • crime
  • Navi Mumbai
  • Navi Mumbai Crime

संबंधित बातम्या

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
1

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Devendra Fadnavis: माथाडी कामगारांसाठी मोठी घोषणा! वडाळ्यात 3 हजार घरे; वाशी मार्केट यार्डचाही होणार पुनर्विकास
2

Devendra Fadnavis: माथाडी कामगारांसाठी मोठी घोषणा! वडाळ्यात 3 हजार घरे; वाशी मार्केट यार्डचाही होणार पुनर्विकास

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
3

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Accident News: डोंगरावरून कार थेट रेल्वे रुळावर; पनवेल-उरण मार्गावरील अप-डाऊन रेल्वे वाहतूक ठप्प
4

Accident News: डोंगरावरून कार थेट रेल्वे रुळावर; पनवेल-उरण मार्गावरील अप-डाऊन रेल्वे वाहतूक ठप्प

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.