सानपाडा रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा स्टँडची मोठी दुरवस्था झालेली आहे. काही महिन्यांपूर्वी सिडकोने रिक्षा स्टँड परिसरात डांबरीकरण केलेले होते. मात्र सात ते आठ दिवसांत पावसामुळे रस्त्यावरील डांबर उखडून रस्त्याची चाळण झालेली आहे. रिक्षा स्टँड परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले आहे. त्यामुळे या ठिकाणी रेल्वेने प्रवास करणाऱ्या रहिवाशांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे सिडको आणि कॉन्ट्रॅक्टर यांनी केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाविषयी प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून रिक्षा स्टँडच्या दुरवस्थेसंदर्भात लवकरच सिडकोकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.