नवी मुंबईतील वाशी सेक्टर १० मधील प्रसिद्ध पंडित आय सर्जरी अॅण्ड लेझर हॉस्पिटलमध्ये निष्काळजी सर्जरीनंतर पाच रुग्णांच्या डोळ्यांचे गंभीर नुकसान झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डॉ. डी. व्ही. पंडित आणि त्यांचा मुलगा डॉ. चंदन पंडित यांच्यावर वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, या दोघांनी नोंदणी नसतानाही आय सर्जरी केल्या आणि त्या सर्जरीनंतर सर्व रुग्णांना सुडोमोनास व्हायरस संसर्ग झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले. या प्रकरणी कोपरखैरणे सेक्टर १४ येथील राजेंद्र गुप्ता यांच्या तक्रारीनंतर चौकशी करण्यात आली होती. तक्रारदारांमध्ये किसन व लक्ष्मी धनावडे, संजीव गुप्ता आणि अंजनी सावंत यांचाही समावेश आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.