पालघर शहरात हिंदू धर्म जागृतीसाठी एक भव्य आणि दिव्य असा धार्मिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शिव शक्ती सेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिव महापुराण कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. शहरातील तब्बल सोळा हिंदुत्ववादी संस्था या उपक्रमासाठी एकत्र आल्या असून, धार्मिक आणि सांस्कृतिक एकतेचे एक प्रभावी उदाहरण पालघरमध्ये पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे समाजात हिंदू धर्माबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि विशेषतः तरुण पिढीत हिंदुत्वाची बीजे रुजवणे हा आहे.दरम्यान, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदचे संयोजक मुकेश दुबे यांनी अलीकडेच 300 कुटुंबांचे शुद्धीकरण करून त्यांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवला होता. त्याच प्रेरणेने आता हा शिव महापुराण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.पालघरमध्ये आयोजित हा शिव महापुराण सोहळा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता, सामाजिक एकात्मता आणि संस्कृती जपण्याचा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न म्हणूनही पाहिला जात आहे.