Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

School Holiday: मुसळधार पावसामुळे ‘या’ जिल्ह्यात उद्या शाळा-कॉलेजांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात उद्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला असून मुंबईत अंधेरी सबवे बंद करण्यात आला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 01, 2026 | 07:47 PM
मुसळधार पावसामुळे 'या' जिल्ह्यात उद्या शाळा-कॉलेजांना सुट्टी (Photo Credit- X)

मुसळधार पावसामुळे 'या' जिल्ह्यात उद्या शाळा-कॉलेजांना सुट्टी (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • मुसळधार पावसामुळे ‘या’ जिल्ह्यात उद्या शाळा-कॉलेजांना सुट्टी
  • जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
  • प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
पालघर: राज्यात मान्सूनचे उशिरा आगमन झाले असले, तरी सध्या मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले असून पालघर जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. हवामान विभागाने (IMD) पालघर जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ (Red Alert) जारी केला आहे. या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर पालघरच्या जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत.

वसई-विरारमध्ये वाहने वाहून गेली; पालघर जिल्हा हायअलर्टवर!

पालघर जिल्ह्यात आज दिवसभर पावसाची धुवांधार हजेरी पाहायला मिळाली. विशेषतः वसई आणि विरार परिसराला पावसाने झोडपून काढले असून अनेक रस्ते जलमय झाले आहेत. सोशल मीडियावर समोर आलेल्या दृश्यांमध्ये काही भागांत वाहने वाहून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हवामान विभागाने पुढील २४ ते ४८ तासांत अत्यंत तीव्र स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना हायअलर्टवर राहण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

मुंबईत पावसाचा फटका; वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी, अंधेरी सबवे बंद

दुसरीकडे, मुंबईतही मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. अनेक सखल भागांत पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतूक मंदावली आहे. मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहनांची मोठी कोंडी झाली असून प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. दरम्यान, अंधेरी सबवेमध्ये  मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने प्रशासनाने सुरक्षेचा उपाय म्हणून हा सबवे वाहतुकीसाठी तात्काळ बंद केला आहे आणि वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली आहे.

Navi Mumbai News : नेरुळमध्ये साचलेल्या पाण्यात करंट; दोन विद्यार्थिनी जखमी, महावितरणचा प्राथमिक अहवाल समोर

प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील ३ दिवस पावसाचा हा जोर असाच कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पालघर आणि मुंबई उपनगरातील आपत्कालीन परिस्थिती पाहता, “नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अत्यंत अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये,” असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बदलापूर-काटई मार्गावर वाहतुकीची कोंडी

मुसळधार पावसामुळे नेवली नाका परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले, ज्यामुळे रस्ता पाण्याखाली गेला आणि वाहतुकीचा सामान्य प्रवाह विस्कळीत झाला. पावसाचे पाणी साचल्याने बदलापूर-काटई मार्गावरील वाहनांची ये-जा तात्पुरती थांबवण्यात आली. वाहतूक पोलिसांनी वाहने पर्यायी मार्गांकडे वळवली आणि पाणी ओसरेपर्यंत व परिस्थिती सुधारेपर्यंत वाहनचालकांना या बाधित मार्गाचा वापर टाळण्याचा सल्ला दिला.

Maharashtra Rain Alert : आता नुसता धो धो पाऊस बरसणार! राज्यात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Web Title: Heavy rain palghar school college holiday declared red alert andheri subway closed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 07:47 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • Maharashtra Rain
  • mansoon
  • Palghar news

संबंधित बातम्या

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
1

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Pune Rain Alert: काळ्या ढगांची दाटी अन् पुण्यात अक्षरश: ‘कोसळ’धार; उद्याचा अलर्ट काय?
2

Pune Rain Alert: काळ्या ढगांची दाटी अन् पुण्यात अक्षरश: ‘कोसळ’धार; उद्याचा अलर्ट काय?

देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत
3

देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत

Rain Update : पुण्यात पावसाची विश्रांती; ढगाळ वातावरण कायम, आज तापमान…
4

Rain Update : पुण्यात पावसाची विश्रांती; ढगाळ वातावरण कायम, आज तापमान…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.