युद्धजन्य परिस्थिती निवळल्यानंतर दोन राष्ट्रवादीचे मनोमिलन होण्याची शक्यता आहे. लवकरच आमदारांची बैठक होईल त्यामध्ये एकीकरणाचा सकारात्मक निर्णय होईल असे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी दिले आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सकारात्मक असल्याचे जाणवते. शरद पवार आणि अजित पवार यांच्या राजकीय भूमिका सध्या वेगळ्या आहेत. त्यांच्या संबंधात कटुता कुठेही जाणवत नाही. त्यामुळे दोन्ही पवार एकत्र आले तर आनंदच आहे.