अखंड भारताचे आराध्य असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह देशभर पाहायला मिळतं असतानाच पिंपरी चिंचवड शहरातील एका अवलियाने शिवराय कणा कणात,शिवराय मनामनात या संकल्पनेवर आधारीत अतिशय लहानात लहान वस्तूंवर शिवरायांच्या मनोहारी प्रतिमा साकारल्या आहेत.
सुरेश जाधव असं या सूक्ष्म चित्रे काढणाऱ्या तरुणाचे नाव आहे. लहानपणापासून चित्रकलेची आवड असणारे सुरेश जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल असलेली आस्था आणि अभिभाव प्रकट करण्यासाठी त्यांनी तीळ पासून ते झाडाची पाने, साली यांच्यावर ५१ पेक्षा अधिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा साकारल्या आहेत. यात शिवरायाच्या जीवनाशी निगडित विविध प्रसंग देखील त्यांनी या चित्रात साकारले आहे. तांदुळाच्या दाण्यावर, तुरीची डाळ , झाडांच्या बिया, इलायची, गोळी, झाडाची साल, माचीसाची काडी आदींवर त्यांनी ह्या कलाकृती साकारल्या आहेत.सहज न दिसणाऱ्या डोळ्यांनी सहज न पाहता येणाऱ्या ,बोटांच्या चिमटीत देखील पकडता येणार नाही अश्या वस्तूवर त्यांनी ह्या कलाकृती साकारल्या आहेत. त्याच्या या कलाकृतीची कुठेतरी नोंद व्हावी अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे
.