सहा लाखांपेक्षा अधिकचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लंपास केला होता, 200 पेक्षा अधिक सीसीटीव्ही आणि गुन्ह्यात वापरलेल्या वाहनावरून मुख्य सूत्रधार सुभाष बिष्णोई असल्याचं समोर आले आहे तर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपी महिपाल बिष्णोई आणि सुरेश ढाका यांना अटक केलीय. पिंपरी चिंचवड पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या महाराष्ट्र राज्यात नोंदणीकृत बनावट नंबर प्लेटचा वापर करून चारचाकी मधून पलायन करत असलेल्या आरोपींना 1200 किलोमीटर पाठलाग करून जयपूर राजस्थान या ठिकाणाहून ताब्यात घेतलं आहे. अटकेत असलेल्या सुरेश ढाकावर गंभीर स्वरूपाचे 21 गुन्हे दाखल आहेत, आरोपींनी या गुन्ह्यात मोबाईल ट्रेस होऊ नये यासाठी वाकी टॉकी चा वापर केला होता, पोलिसांनी चार वाकी टॉकी आणि दोन मोबाईल फोन देखील जप्त केले आहेत , दोन महिन्यांपासून दरोडेखोरांनी हा दरोडा टाकण्याचा कट रचला होता, हे सर्व पोलीस तपासात समोर आलं आहे. उर्वरित अन्य आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांना त्यांना ताब्यात घेणार असल्याचं पोलिसांनी म्हटले आहे.