वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे नांदेड दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पहलगामच्या दहशदवादी हल्ल्याबाबत आंबेडकरांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. केंद्र सरकार सध्या काश्मीर येथे घडलेल्या घटनेवर आक्रमक झाले आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ सिंधूनदीच्या पाणी वाटपावर सध्य़ा स्थगिती आहे. मात्र पाणी वाटपावर स्थिगिती आणून काही होणार नाही. पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्यासाठी केंद्र सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा नसेल, तर आम्ही त्यांना देण्यास तयार आहोत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाकिस्तानी नागरिक १०७ असून, त्यांना शोधून काढून योग्य कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे, तर फडणवीस म्हणत आहेत की, आम्ही त्यांना परत पाठवले आहे. त्यामुळे हे सिद्ध होत की, एवढ्या गंभीर प्रकरणानंतर देखील या राज्य सरकारमध्ये ताळमेळ नसल्याचे दिसत आहे. अशी जहरी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र व राज्य सरकार वरती केली आहे.