विश्व हिंदू परिषद, पुणे व श्री शिवराज्याभिषेक दिन अभिवादन समिती (किल्ले सिंहगड) च्या वतीने तिथीनुसार श्री शिवराज्याभिषेक दिन व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त किल्ले सिंहगड येथे भव्य अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सोहळ्याचा प्रारंभ रविवारी सकाळी छत्रपती राजाराम पूलाजवळील वीर बाजी पासलकर स्मारकपासून आयोजित विराट दुचाकी रॅलीने झाला. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शिल्पाचे पूजन झाले. यावेळी सरदार हिरोजी इंदलकर यांचे वंशज, समितीचे अध्यक्ष किशोर चव्हाण, उपाध्यक्ष शरद जगताप, विभाग मंत्री केतन घोडके, धनंजय गायकवाड यांसह शिवभक्त उपस्थित होते. अभिवादन सोहळ्याचे यंदाचे हे आठवे वर्ष होते.