रायगड जिल्ह्यातील अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत बनावट नोट छपाई प्रकरण उघडकीस आले आहे. पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर साळे आणि त्यांच्या टीमने मयेकर वाडा (आळी) येथे छापा टाकून कारवाई केली. सुरुवातीच्या तपासात ४ लाखांहून अधिक रुपये मूल्याच्या नोटा जप्त झाल्या असून, पुढील तपासात एकूण १२ लाख रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या. या प्रकरणी भूषण विजय पतंगे याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.