रायगड जिल्हा मुख्यालयाकडे जाणाऱ्या अलिबाग–वडखळ रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खोल खड्ड्यांमुळे वाहन चालक आणि प्रवाशांचे हाल होत आहेत. नुकतीच एका BMW कारला या खड्ड्यांचा फटका बसला आणि ती रस्त्यातच अडकली. या घटनेनंतर मनसैनिकांनी संताप व्यक्त करत प्रशासन आणि सरकारवर तीव्र टीका केली. मनसे जिल्हा संघटक किरण गुरव यांनी तत्काळ रस्त्याची पाहणी करून रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.