पेण नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ (रामवाडी) मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व महायुतीच्या अधिकृत उमेदवार वसुधा पाटील या बिनविरोध विजयी झाल्या आहेत.वसुधा पाटील यांनी दाखल केलेल्या नामनिर्देशन अर्जाविरोधात अखेरच्या दिवशी कोणत्याही उमेदवाराने अर्ज न भरल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. या विजयामुळे पेणमध्ये तसेच संपूर्ण रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विजयानंतर खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी वसुधा पाटील यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.