कर्जतमध्ये आज अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पार पडली. मात्र ही बैठक पक्षप्रवेश सोहळ्यात रूपांतरित झाली. शिंदे गटाचे कर्जत विधानसभा संपर्कप्रमुख पंकज पाटील, त्यांचे वडील बंधू पाटील, खोपोलीतील युवा नेते दिनेश जाधव आणि भाजपचे चंद्रप्पा अनिवार यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. या प्रवेशामुळे आमदार महेंद्र थोरवे यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. यावेळी सुनील तटकरे यांनी नगरपरिषद निवडणुकांसाठी माथेरान आणि कर्जत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर केले, तर खोपोलीचा उमेदवार दोन दिवसांत घोषित होईल असे सांगितले.