गावाला मुबलक पाणी मिळावं यासाठी रत्नागिरीतील चिंद्रवली गावात वर्षभरापूर्वी सतीचा पऱ्या या ठिकाणी वळण बंधारा बांधण्यात आला. मात्र या बंधाऱ्यात पाणीच साचत नसल्यानं गावाला भीषण पाणी टंचाई उद्भवणार आहे. कच्चा बंधारा असताना गावाला पाणी पुरवठा होत होता मात्र चुकीच्या पद्धतीनं बांधण्यात आलेल्या पक्क्या बंधाऱ्यात पाण्याची साठवणूक होत नाही. याच पाण्यावर भाजीपाला करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील शेतीसाठी मुबलक पाणी मिळत नाही. त्यामुळे बंधाऱ्यासाठी खर्ची झालेले शासनाचे 44 लाख रुपये पाण्यात गेलेत अशी प्रतिक्रिया चिंद्रवली येथील ग्रामस्थांनी दिली आहेत.