सिंधुदुर्ग जिल्हयात नारायण राणे यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घ्या असे स्पष्ट आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यांच्याशी चर्चा करूनच आम्ही पुढची वाटचाल केल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केले. सिंधुदुर्गात नगरपालिका निवडणूकीत भाजप शिवसेनची युती झाली नाही त्यावर ते बोलत होते. महायुती व्हावी अशी नारायण राणे यांची भूमिका होती. मी, केसरकर आणि निलेश राणे तिघांनीही नारायण राणे यांच्याशी चर्चा केली. त्यासाठी आम्ही शेवटपर्यंत थांबलो होतो. शेवटी नारायण राणे यांनी सांगितल्यानंतरच आम्ही पुढे गेलो. सावंतवाडी कुडाळ आणि मालवणमध्ये आम्ही स्वबळावर लढत असल्याचे त्यांनी सांगितले. रायगड जिल्ह्यात अनेक नगरपालिकांमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी सोबत आहोत. जिथं वैयक्तिक हेवेदावे आहेत तेथे राष्ट्रवादी कॉंग्रेस आमच्या सोबत आली नाही हे खरं असल्याची कबुली उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. पण जिथं युती झाली नाही किंवा आमचे स्वतंत्र उमेदवार आहेत तेथे आम्ही जिंकणार आहोत हे देखील सत्य आहे. जिथं जिथं ज्यांना आम्ही कमिटमेंट दिली आहे तेथे आम्ही त्यांचयासोबत आहोत मात्र जिथं आमच्याबरोबर कुणी नाही तेथे आमची जनतेशी कमिटमेंट असल्याचं सामंत म्हणाले.