21 जून हा दरवर्षी जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो या दिवशी योगिनी स्मार्त एकादशी आणि जागतिक संगीत दिन असल्याने या दिनांचे औचित्य साधून जिल्हा परिषद सांगली, विश्व योगदर्शन केंद्र सांगली आणि चितळे डेअरी भिलवडी यांच्या संयुक्त विद्यमाने वारकरी तालावर “भक्तीयोग” हा कार्यक्रम होणार असून यामध्ये सांगली जिल्ह्यातील तीन हजार पेक्षा जास्त केंद्रांच्या माध्यमातून पाच लाखांपेक्षा जास्त नागरिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम वर मुख्य केंद्र असून या माध्यमातून आभासी पद्धतीने एकाच वेळी एकाच तालावर सहभागी होऊन योगासने करण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया, आशिया बुक ऑफ रेकॉर्डस, आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये नोंद होण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.