गावागावातील जलाशयामधील गाळ काढण्याची योजना महाराष्ट्र शासन राबवित असून या योजनेअंतर्गत गाळ काढण्याचे काम प्रशासनाने निवडलेल्या स्वयंसेवी संस्था अथवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून करण्यात येत आहे. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार तसेच नाला खोलीकरण आणि रुंदीकरण या माध्यमातून करण्यात येणार असून याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भारतीय जैन संघटनेच्या वतीने संपूर्ण जिल्हाभरात जलरथ फिरणार असून या जल रथाचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.