छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामधील खुलताबाद मध्ये असणाऱ्या औरंगजेबाच्या कबरी बाहेर मोगल सम्राट बादशहा हजरत औरंगजेब आलमगीर अशा तऱ्हेचा बोर्ड लावण्यात आलेला आहे. औरंगजेब हा सुफी संत नसल्याने त्याच्या नावासमोर हजरत हा शब्द लावण्यात आलेला आहे. शिवाय या कबरीवर अनेक लोकांकडून चादर चढवून या ठिकाणी नमाजही पठण केले जाते याला शासनाने बंदी घालावी. आणि या कबरेवर लावलेला हा बोर्ड ताबडतोब काढून टाकावा अशी मागणी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती. त्यानुसार मंत्री बावनकुळे यांनी त्रपती संभाजी नगरच्या जिल्हाधिकार्यांना तसे आदेश दिले होते परंतु हे आदेश डावलत जिल्हाधिकाऱ्यांनी तो बोर्ड न काढल्याने नितीन शिंदे हे छत्रपती संभाजी नगरला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी जाणार होते परंतु आज छत्रपती संभाजी नगर पोलीस प्रशासनाने नितीन शिंदे यांना सांगलीमध्ये येऊन जिल्हा बंदीची नोटीस बजावली आहे.