सावंतवाडी नगरपरिषदेत कथित १७ लाख रुपयांच्या पाणीपुरवठा गैरव्यवहार प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. मासिक सभेतील गदारोळ आणि सत्ताधारी शिंदे शिवसेनेच्या सभात्यागानंतर पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी नगरपालिकेत गेल्या तीन महिन्यांपासून कथित १७ लाख रुपयांच्या पाणीपुरवठा गैरव्यवहाराचे प्रकरण चर्चेत आहे. काल झालेल्या मासिक सभेत या प्रकरणावरून तीव्र गदारोळ झाला. त्यानंतर पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांनी आपला राजीनामा नगराध्यक्षांकडे सुपूर्द केला.