वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली विधान परिषद निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह उफाळून आला असून काँग्रेस नेते शैलेश अग्रवाल यांनी पक्ष नेतृत्वावर थेट आणि गंभीर आरोपांची सरबत्ती केली आहे. निवडणुकीत पक्षातील काही नेत्यांनीच उमेदवारी कमकुवत करण्यासाठी काम केल्याचा दावा करत त्यांनी मतदार फोडणे, आर्थिक व्यवहार आणि संघटनात्मक गैरव्यवहारांचे आरोप केले. प्रदेशाध्यक्षांमध्ये निर्णयक्षमता नसल्याचा आरोप करत अग्रवाल यांनी निलंबन कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध केला. “माझे निलंबन मागे घेण्यासाठी मी कोणाकडेही विनंती करणार नाही. निष्कासित करायचे असेल तर करा, अन्यथा मी स्वतः पक्ष सोडल्याचे जाहीर केले आहे,” असा इशाराच त्यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.