विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली असून, दोघेही एकाच वाहनातून सांगलीकडे रवाना झाले आहेत. तानाजी पाटील यांनी भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मनधरणीचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. यामध्येच धैर्यशील कदम आणि पालकमंत्री शंभूराजे यांची एकाच गाडीतून प्रवासामध्ये नेमकी काय चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई कशा पद्धतीने शिवसेनेचेबंडखोर उमेदवार तानाजी पाटील यांची मनधरणी करण्यात महत्वाचं ठरणार आहे.. त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओंकार सोनावले यांनी..