अमरावतीत रवी राणा यांच्या निवास्थानाबाहेर शिवसेनेचं आंदोलन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसा लावावी अन्यथा आम्ही मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करू. या राणा दाम्पत्याच्या वक्तव्यानंतर नवनीत राणा व रवी राणा आणि शिवसैनिकात राजकीय ठिणगी उडाली आहे. आज राणा यांच्या अमरावतीतील गंगा सावित्री या निवासस्थानासमोर शिवसैनिक हजारोच्या संख्येने गेले होते. मात्र पोलिसांनी त्यांना राणा यांच्या घराजवळच अडवलं.